नागपुरी वडाभात

साहित्य :- 

nagpuri

( वड्यांसाठी ) 

१) एक वाटी हरभरा डाळ 

२) अर्धी वाटी तूर डाळ 

३) मुग 

४) उडीद 

५) मटकीची डाळ प्रत्येकी पाव वाटी 

६) अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा 

७) थोडे धने-जिरं 

८) सुक्या मिरच्या 

९) लसूण , थोडी कोथिंबीर , कढीपत्ता , मीठ , तील .  

( भातासाठी ) 

१)दोन वाटया तांदळाचा मोकळा फडफडीत भात 

२) तेल 

३) फोडणीच साहित्य .  

कृती :-  

१) सगळ्या डाळी पाच-सहा तास भिजत घालून , उपसून , पाणी न घालता रवाळ वाटाव्या 

२) वाटताना त्यात धने , मिरच्या , जिरं आणि लसूण घालावा . 

३) नंतर त्यात इतर साहित्य घालून त्या पीठाचे छोटे-छोटे वडे थापून गरम तेलात तळून काढावे .  

४)मोकळ्या भातावर चार-पाच वडे कुस्करून घालावे आणि खायला देताना मोहरी , हिंग , हळद घालून तेलाची फोडणी भातावर  घालावी . 

५)या भाताबरोबर ( साखर न घालता ) ताकाची कढी करावी .