नवरात्रोत्सव
|हिंदु धर्मात भगवतीदेवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे.
नऊ दिवस आदिशक्त्तीची आराधना करण्याचा हा सण!
पावसाळा संपत आलेला असतो, पीके तयार होत आलेली असतात. काही तयार झालेली असतात. बळीराजा खुशीत असतो.
घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. फेर धरुन पारंपारिक भोंडल्याची गाणी म्हणतात.
घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदिशक्ति-आदिमायेची मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रह्मांडात मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणार्या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे.
महात्म्य
नवरात्रीतील नऊ दिवसांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते. आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपांसहित भाषांतरांवरूनरमण करणे, म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळातील पृथ्वीवरील त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे. हे नऊ दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींनी प्रक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी, तसेच आदिशक्तीच्या मारक रूपी चैतन्यमय लहरींचे युद्ध चालू असते. या वेळी ब्रह्मांडातील वातावरण तप्त झालेले असते व श्री दुर्गादेवीच्या शस्त्रांतून तेजाची झळाळी अतिवेगाने सूक्ष्मक्तींवर हल्ला करत असते.
याचे प्रतीक म्हणून घट व त्यातील नंदादिप यांना प्रतिकात्मक रूपात पूजले जाते. घटात दीपाच्या उष्णतेमुळे निर्माण झालेले वातावरण हे ब्रह्मांडात नऊ दिवस अहोरात्र सुरू असलेल्या युद्धातून निर्माण झालेल्या तप्त वायूमंडलाशी साधर्मय दर्शवते, तर दीप हा आदिशक्तीच्या शस्त्रास्त्रांतून निर्माण होणार्या तेजाचे प्रतीक म्हणून कार्य करतो. घरात घटपूजन केल्याने वास्तमध्येही श्री दुर्गादेवीचे मारक चैतन्य कार्यरत होऊन वास्तूतील त्रासदायक लहरींचे निर्दालन करते