सौंदर्य खुलवितांना मान
|
सुंदर दिसण्यासाठी फक्त चेहराच सुंदर असून चालत नाही तर सर्वांगीण सौंदर्य मिळवण्यासाठी नितळ , तेजस्वी चेहऱ्यासोबत सुडौल , नितळ मान , गळा हे सौंदर्य वाढविण्याचे पूरक काम करतात .
सकाळी व रात्री मानेची पुढीलप्रमाणे निगा राखावी :-
१) क्लिन्झिंग मिल्कने कापसाने मान स्वच्छ साफ करावी . यासाठी साधे दुधही वापरता येईल . यामुळे मेकअप , क्रीम इ. साफ होईल .
२) चंदन पावडर व मुलतानी माती दह्यात भिजवून मानेला चोळून दहा मिनिटे धुवावे .
३) लिंबूरस , दुध पावडर , गुलाबपाणी एकत्र करून मानेला लावावे . वीस मिनिटांनी धुवावे . रेशमी कापडाने मान/गळा हलकेच घासावे . त्वचा स्वच्छ , तेजस्वी होते .
४) बदाम तेल , कोल्डक्रीम व गुलाबपाणी समप्रमाणात एकत्र करून एक मसाज क्रीम करावे . ती मसाज क्रीम बोटांना लावून हळूवारपणे मसाज करावा .
५) ओटचे जाडसर पीठ , लिंबूरस व दही एकत्र करून मानेला मसाज करावा . तो मसाज केलेला थर अर्धा तास ठेवून काढावा . नंतर मॉइश्चरायझर लावावे . दही व ओटमुळे मृतपेशी निघून लिंबामुळे थोडा ब्लिचिंगसारखा फायदा मिळतो .
sachin pawar