मतदार नोंदणी मोहीम…..
|भारताच्या सध्याच्या एकूण राजकीय परिस्थितीविषयी कुणी चांगले बोलत नाही. डॉलरची वाढती किंमत, गगनाला भिडलेली महागाई आणि भ्रष्टाचाराची एकेक बाहेर येणारी प्रकरणे यामुळे जनता अगदी हैराण झाली आहे. जो-तो उठ-सूट सरकारला दुषणे देत असतो. पण जेव्हा वेळ होती तेव्हा आपण आपले कर्तव्य बजावले का? सरकार निवडण्याच्या प्रक्रियेत आपण सहभागी झालो का? याचा विचार कुणी केलाय? जो व्यक्ती मतदान करणे टाळतो अशा व्यक्तीला सरकारला दुषणे देण्याचा काहीएक अधिकार नाही!
सध्याच्या परिस्थितीविषयी सरकारला दोष देण्यापेक्षा योग्य वेळी आपले कर्तव्य चोख बजावायला हवे! आपले कर्तव्य म्हणजे मतदानावेळी आपल मतदानाचा हक्क बजावणे. कित्येक लोक निवडणुकांच्या वेळी मतदानालाच जात नाहीच, बऱ्याच जणांचे मतदार यादीत नावच नसते आणि काही महाभागांना तर आपले नाव मतदारयादीत नाव आहे किंवा नाही हेदेखील ठाऊक नसते. याविषयी विचारल्यावर बरेच जण म्हणतात कि, आपल्या मेक मताने काय फरक पडणार आहे? तुमच्या एका मताने फारसा काही फरक पडणार नसेलही, मात्र अशा कित्येक एकेका मताने फार मोठा फरक पडेल हे निश्चित? ‘थेंबे थेंबे तळे साचे’ हि म्हण उगाचच नाही रूढ झाली?
आपले मतदान हे परिवर्तन आणि नवीन राजकीय बदलाची नांदी ठरू शकते. त्याकरीता आपेल नाव मतदार यादीत आहे किंवा नाही हे तपासून पाहायला हवे. ज्यांनी वयाची अठरा वर्षे पूर्ण केली असेल आणि नाव मतदार यादीत नसेल त्यांच्याकरिता मतदार नोंदणी मोहीम सुरु झालेली आहे. विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या महसूल कार्यालयात जमा करावयाचा आहे. हि मोहीम १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर पर्यंत चालू आहे! ज्यांना मतदारयादीतील आपले नाव किंवा पत्त्यात बदल करावयाचा असेल असे लोकही आपला अर्ज दाखल करू शकतात.
उद्याच्या पिढीचे तुमच्याविषयी चांगले मत असावे असे मनोमन वाटत असेल तर आजच आपले नाव मतदारयादीत आहे किंवा नाही याची खात्री करून ते समाविष्ट करून घ्या आणि येणाऱ्या निवडणुकांच्यावेळी आपल मत नोंदवा. अन्यथा येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही!