वनविभागाच्या निष्काळजीपणाने घेतले शेकडो वन्य जीवांचे प्राण…

jungleजंगली प्राणी आणि जंगले वाचविण्याचे आवाहन सरकारी वन विभाग नेहमीच करते. मात्र, वनविभागाच्याच निष्काळजीपणामुळे शेकडो वन्य प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागण्याची घटना हिंगोली जिल्ह्यात घडल्याची दैनिक “सकाळ”च्या संकेतस्थळावर प्रसारित झालेल्या वृत्तानुसार उघडकीस येत आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथचे डोंगर, शिरड शहापूरचे वनक्षेत्र, पूर्णा नदीच्या परिसरातील वनक्षेत्र, सेनगाव तालुक्‍यातील जांभरुण भागातील वनक्षेत्र, माळहिवरा भागातील डोंगराळ प्रदेश असे सुमारे २९००० हेक्टर क्षेत्रात झुडपी प्रकारचे जंगल वसलेले आहे.
ह्या जंगलात बिबट्या, हरीण, तरस, कोळे, लांडगे हे वन्य प्राणी तसेच मोरही मोठया प्रमाणात अआधाल्तात. जंगलात पाणवठे आहेत, मात्र कडक उन्हामुळे हे पाणवठे कोरडे पडले आहेत. ह्या जेमतेम १२ पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्याची व्यवस्था वनविभागाने केली नाही. त्यामुळे वन्य जीव पाण्यासाठी विहिरी ढुंकू लागला. असे करतांना विहिरीत पडल्याने अनेक वन्य जीव मृत्यूमुखी पडले तर काहींना वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. मृत्यू पावलेल्या वन्यजीवांचा सरकार दफ्तरी लेख-जोखाही नसल्याची माहिती समोर येत आहे.

सविस्तर वृत्त येथे वाचा…

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *