नारायणमूर्ती पुन्हा इन्फोसिस मध्ये….

nrnजगातील अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी पैकी एक असा लौकिक असलेल्या ‘इन्फोसिस’ कंपनीच्या ‘कार्यकारी संचालक’ पदाची सूत्रे आज पुन्हा कंपनीचे संस्थापक नारायणमूर्ती यांनी स्वीकारली.
के. व्ही. कामथ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर नारायणमूर्तींची निवड करण्यात आली. पुढची पाच वर्षे ते ह्या पदावर राहतील. ह्या पदासाठी  त्यांनी केवळ वार्षिक एक रुपया एवढे मानधन स्वीकारले आहे. इन्फोसिसची स्थापना नारायणमूर्तींनी १९८१ साली केल्यानंतर पुढील २१ वर्षे ते कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून काम बघत होते, मात्र २०११ साली त्यांनी कंपनीतील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता.