कांदा पराठा

साहित्य :-paratha

१)      एक वाटी कणीक

२)     अर्धी वाटी मैदा

३)     एक मोठा चमचा तुपाचं मोहन

४)     अर्धा चमचा मीठ

५)    अर्धा चमचा साखर

६)      दोन कांदे अगदी बारीक चिरून किंवा किसून + चवीपुरतं मीठ +  चिमुटभर साखर + अर्धा चमचा तिखट हे मिश्रण कालवून .

कृती :-

१)      मीठ-साखर आणि तुपाचं मोहन घालून कणीक व मैदा भिजवून घ्यावा .

२)     त्याचे मध्यम आकाराचे बारा फुलके करावेत .  आता एका फुलक्यावर      कांद्याचं मिश्रण पसरावं .

३)     त्यावर दुसरा फुलका कडा दाबून चिकटवावा आणि हलक्या हातानं लाटावा      व तव्यावर शेकावा .

४)     अगदी खायला घेतांना पुन्हा तेल सोडून खरपूस भाजावा .  उरलेल्या फुलक्यात पाच पराठे करावे .