विठुरायाच्या दर्शनाची रांग आता ‘ऑनलाइन’ ….!

पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्टाचे प्रमुख श्रद्धास्थान.vithu_mauli

दर वर्षी आषाढी-कार्तिकीला लाखो भाविक पंढरपूरांत दाखल होऊन विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात. ह्यावेळी होणाऱ्या गर्दीमुळे दर्शनासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागते. यांच भाविकांची सोय म्हणून त्यांना सुलभ दर्शन घेता येण्यासाठी मंदिर समितीने एक वेबसाईट बनविली आहे. त्याद्वारे यंदाच्या आषाढी एकादशीपासून दर्शन घेता येणे शक्य आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याचे विठ्ठल—रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी सांगितले. समितीची आषाढी नियोजन बैठक अध्यक्ष अण्णा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी रात्री झाली. त्या बैठीकीत त्यांनी हि माहिती दिली. www.vitthalrukminimandir.org संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून, याद्वारे पददर्शन नोंदणी करून दर्शनाचा लाभ घेणे शक्य होईल.

5 Comments