पडवळ-डाळींब्यांची भाजी
|१) मोडाच्या डाळींब्या एक वाटी
२) चिरलेलं पडवळ दोन ते अडीच वाटया
३) जिरं , गुळ
४) मीठ , ओलं वा सुकं खोबरं
५) फोडणीचं साहित्य
६) तेल , तिखट
७) गोडा मसाला .
कृती :-
१) हिंगाची फोडणी करून त्यावर डाळींब्या परतून बारीक चिरलेला पडवळ टाकावा .
२) परतून गरम पाणी अर्धी वाटी घालावं .
३) शिजत आल्यावर मीठ , जिरं , सुकं वा ओलं खोबरं वाटून घालावं .
४) चमचाभर लाल तिखट व चमचाभर गोडा मसाला घालून चंगली वाफ आणावी .