पालक पुरी
|१) दीड वाटी कणीक
२) अर्धी वाटी रवा किंवा बेसन
३) पाव चमचा हळद
४) पाव चमचा ओवा
५) पालकाची दहा-बारा मोठी पानं
६) आवडत असल्यास तीन-चार लसूण पाकळ्या
७) तळण्यासाठी तेल
८) चवीपुरतं मीठ .
पालक पुरी कृती :-
१) पालकाची पानं धुऊन घेऊन हातानंच त्याचे तुकडे करून त्यात लसणाच्या तीन-चार पाकळ्या घालून मिक्सरमधून वाटून घ्या .
२) या पालकामध्येच कणिक व रवा , हळद , मीठ , ओवा , दोन चमचे तेल घालून घट्ट भिजवून घ्या . (आवश्यकता असल्यासच थोडं पाणी घाला .)
३) पीठ भिजवल्यानंतर किमान वीस मिनीटानं त्याच्या पुऱ्या लाटून तळून घ्या .
४) या पुऱ्या तीन-चार दिवस टिकत असल्यानं डब्यासाठी , प्रवासात सुटसुटीत होतात . चहा-कॉफी बरोबरही चांगल्या लागतात .