पालक पुऱ्या

साहित्य :palak puri

१)      अर्धी जुडी पालक

२)     दोन-तीन वाटया कणीक

३)     अर्धी वाटी बेसन

४)     हिरव्या मिरच्या

५)    आलं वाटून , तेल

६)      चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      पालक निवडून धुऊन बारीक चिरावा .  गरम तेलावर मिरच्या , वाटलेलं आलं आणि चिरलेला पालक टाकून एक वाफ आणावी .

२)     त्यात मीठ घालून मिक्सरमधून काढावं .  त्यात अर्धी वाटी बेसन आणि मावेल एवढी कणीक घालून घट्ट भिजवावं .

३)     ही कणीक जास्त वेळ ठेवू नये; तेवते .  याप्रमाणे मेथी-ओव्याची पानं , पुदिना , आंबट चुका यांच्याही पुऱ्या होऊ शकतात .