पनीर पराठा

साहित्य :-panner paratha

१)      अर्धी वाटी किसलेलं पनीर

२)     एक चमचा लोणच्याचा मसाला

३)     अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा

४)     मुठभर कोथिंबीर चिरून

५)    मीठ-साखर चवीप्रमाणे

६)      चार पोळ्यांची कणीक

७)    तेल किंवा तूप किंवा बटर .

कृती :-

१)      प्रथम सारणाचे जिन्नस तयार करावे .  व कणकेचे आठ गोळे तयार करावे .

२)     आता एका फुलक्यावर पनीरचे मिश्रण पसरावं .  त्यावर दुसरं फुलका कडा   दाबून चिकटवावा आणि हलक्या हातांनी लाटावा व तव्यावर शेकावा .

३)     फुलके उरलेले असतील तर त्या फुलक्यात पराठे तयार करावे .  व नाश्ता करतेवेळी या पराठ्यांचा आस्वाद घ्यावा .