पनीर चीज पराठे

साहित्य :-pneer chees

१)      दीड कप कणीक

२)     पाव किलो पनीर

३)     अर्धा चमचा कांदा मसाला

४)     अर्धा चमचा जिरे पूड

५)    अर्धा चमचा धणेपूड

६)      अर्धी वाटी चीज स्प्रेड

७)    अर्ध वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

८)     दोन मिरच्या बारीक चिरून

९)      अर्धा चमचा साखर , अर्धा कप मैदा

१०)  डाळीचं पीठ पाव कप , लाटायला मैदा

११)   एक कांदा बारीक चिरून

१२)  एक डाव तेल , तूप वरून सोडायला .

कृती :-

१)      कणीक , मीठ , मैदा आणि डाळीचं पीठ एकत्र करून डावभर गरम तेल      घालून मऊ भिजवावं .

२)     पनीर किसून त्यात कांदा , कोथिंबीर , मिरच्या , धने-जिरे पूड , कांदा मसाला , साखर घालून हलक्या हातानं मिसळावं .

३)     भिजवलेल्या पीठाचे दहा गोळे करून त्याच्या पातळ पोळ्या लाटाव्यात .

४)     मग एक पोळी घेऊन तिच्या अर्ध्या भागावर चीज स्प्रेड हातानं लावावं .

५)    त्यावर पनीर मिश्रण पसरवावं व पोळीच्या उरलेल्या अर्ध्या भागनं ते झाकून  कडा दाबून चिकटवाव्या .

६)      त्यावरून हलकेच लाटणं फिरवावं व तव्यावर तूप सोडून अशा घडया केलेले पराठे भाजावेत .  लोणचं किंवा पुदिन्याच्या दह्याबरोबर दयावेत .