PF चे पैसे तीन दिवसांत खात्यावर जमा….!

नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर किंवा provident FUndsनोकरी सोडल्यानंतर भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF Provident Fund चे पैसे मिळविण्याकरिता आज साधारणतः ४५ दिवस वाट पहावी लागते. काहीवेळा त्याहूनही जास्त वाट पहावी लागते. मात्र आता इतकी वाट पाहण्याची गरज नसून फक्त ७२ तासांत भविष्य निर्वाह निधीतील जमा पुंजी तुम्हाला मिळू शकेल. ही प्रक्रिया राबविण्यासाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेची एक विशेष बैठक ५ जुलै रोजी होणार असून, यामध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल.
भविष्य निर्वाह निधी विभागातील संगणकीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे विभागाच्या कामांना गती आली आहे. यामुळेच एखादा अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष लाभार्थीच्या खात्यात तिसर्‍या दिवशी पैसे जमा करणे शक्य होईल. याचा लाभ ज्यांना प्रॉव्हिंडट फंडांचे पैसे काढायचे आहेत त्यांना तर होईलच पण, नवीन नोकरी स्वीकारल्यावर अथवा नोकरी बदलल्यावर जर पीएफचे खाते हस्तांतरित करायचे असेल तर त्यांचीही प्रक्रिया तीन दिवसांत पार पडेल. 

9 Comments