pocket money आणि तरुणाई… !

tsrभारत हा तरुणाईचा यंगीस्थान म्हणून ओळखला जातो,
देशाची कमान ह्या तरुणाईच्या  खांद्यावरच आहे ज्यामुळे आपण vision २०२० महासत्तेच स्वप्न उराशी बाळगलं आहे,तेही ह्याच तरुणाईच्या जीवावर.
मात्र ह्या तरुणाईला हवंय तरी
काय ? सहसा हा प्रश्न त्यांना कुणीच विचारात नाही जो अगदी महत्वाचा आहे.
अहो…. lifestyle बदलत आहे,जमाना technology चा आहे. त्यामुळे धावत्या जगाशी आणि आधुनिकतेशी सालोखी करण्यासाठी ह्या तरुणाईला हवा pocket money !
होय…. होय pocket money.
कॉलेज चा कट्टा असो वा पिकनिकचा अड्डा,party तो बनती हे,… !
birthaday ची party मित्रांना दयायची त्यासाठी हवा पैसा,प्रेयसीला movie दाखवायचा त्यासाठी हवा पैसा,mobile तर android घेतला पण इंटरनेट च्या recharge साठी सुद्धा हवा पैसा.
आणि त्यासाठी हवी भरगच्च pocket money.
कॉलेज कॅन्टीनला बसल्यावर वडापाव बरोबर कोक हवा,शिवाय मित्रांचा गराडा असला तर त्यांना treat दयावीच लागते,
अशात खिसा फाटका असला तर इज्जतीचा पचका होतो.
घरातून मिळणारी pocket money फारच कमी असते, त्यामुळे काही तरुण अतिरिक्त खर्चासाठी part time जॉब शोधतात,
तर काही malls मध्ये night-shift देखील करतात.
मात्र जर शौक जर भलताच असेल,किव्हा फारच व्यसनाधीन असेल तर,काही तरुण झटपट पैसा मिळविण्याच्या नादात गुन्हेगारीकडे सुद्धा वळताना दिसतात,
त्यामुळे आपल्या गरजा जर मर्यादित असल्या आणि चिकाटीची सवय जर अंगीकृत केली तर पैशाची चनचन भासण्याच काही कारणच नाही.
2 Comments