पोहे उत्तप्पा

साहित्य :-

uttamp

१)      अर्धी वाटी उडीद डाळ

२)     दीड वाटी तांदूळ

३)     एक वाटी जाड पोहे

४)     अर्धा चमचा मेथी दाणे

५)    अर्धी वाटी ओलं खोबरं

६)      अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ

७)    चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      डाळ-तांदूळ , मेथी सहा-सात तास भिजत घालून खोबरं , मीठ , गूळ , पोह्यांबरोबर बारीक वाटून घ्यावं .

२)     हे मिश्रण पाच-सहा तास फुगायला ठेवावं .  उत्तप्पा करतेवेळी पीठ पळीनं घोटून घ्यायचं .  गरज वाटल्यास थोडं पाणी घालायचं .  एका वाटीत तेल आणि दुसऱ्या वाटीत पाणी तयार ठेवायचं .

३)     बीडचा तवा असेल तर तो तापल्यावर पेपर नैपकिनला तेल लावून तवा पुसून घ्यायचा .  मग तवा पुरेसा तापला , की नाही हे बघण्यासाठी त्यावर पाणी शिंपडायचं .  गैस मात्र मोठाच हवा .

४)     पाणी झटकन वाफ होऊन नाहीस झालं , की एक डावभर पीठ मध्यभागी ओतायचं आणि डावाच्या तळानं किंवा वाटीच्या तळानं पीठ भराभर गोलाकार पसरायचं .

५)    तापलेल्या तव्यावर आपल्या आवडीप्रमाणे किंवा तळहाताएवढे उत्तप्पे घाला .  व तेल सोडून झाकण ठेवावं .  हवं असल्यास दुसऱ्या बाजूनं लालसर करावे .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *