बटाट्याची चटणी
|१) एक वाटी सालासकट बटाट्याच्या बारीक चिरलेल्या फोडी
२) तीन-चार हिरव्या मिरच्या
३) दहा-बारा कढीलिंबाची बारीक चिरलेली पान
४) एक मोठा चमचा शेंगदाण्याचा कूट
५) अर्धा चमचा साखर
६) एक चमचा लिंबाचा रस
७) दोन मोठे चमचे तेल
८) चिमुटभर मेथी पावडर
९) फोडणीसाठी मोहरी , हळद , हिंग
१०) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) तेलाची फोडणी करून त्यात मेथीपूड घालावी . मिरच्या , कढीलिंब टाकून परतून घ्यावं .
२) मग बटाटाच्या फोडी घालून परतून झाकण ठेवावं . फोडी शिजल्या की त्यात चवीला मीठ , शेंगदाण्याचा कूट , साखर घालून खूप वेळ परतून चटणी कोरडी करावी . खाली उतरवून लिंबाचा रस घालावा .