रवा इडली

rava idli recipe in marathi
rava idli recipe in marathi

साहित्य :-

१)      चार वाटया बारीक रवा

२)     फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल

३)     अर्धा चमचा जिरं

४)     मोहरी , हिंग

५)    एक चमचा उडीद डाळ

६)      सात-आठ कढीलिंबाची पानं बारीक चिरून

७)    हवं असल्यास हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे

८)     एक चमचा आल्याचे बारीक चिरलेले तुकडे

९)      दोन चमचे फ्रुटसॉल्ट

१०)  दोन चमचे मीठ .

कृती :-

१)      एका मोठया रुमालात रव्याची पुरचुंडी बांधून ती एखादया ताटलीवर ठेवून कुकरमध्ये कोरडीच वाफवावी .

२)     गार झाल्यावर रवा मोकळा करून घ्यावा .  तेलाची फोडणी करून त्यात   मिरच्या , कढीलिंब , उडदाची डाळ , आल्याचे तुकडे घालून परतावे आणि      ती फोडणी , मीठ , फ्रुट सॉल्ट घालून मिश्रण चांगलं कालवावं .  डब्यात    भरून ठेवावं .

३)     इडली करायच्या वेळी कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवावं .  इडलीपात्राच्या वाट्यांना तेलाचा हात लावू नये .

४)     एक वाटी मिश्रण , एक वाटी आंबट दही भराभर फेसून एकत्र करावं आणि इडलीपात्रात घालून इडल्या उकडाव्या .

सहा-सात इडल्या होतात .  इडलीपत्राऐवजी एखादया पसरट लंगडीला तेलाचा  हात लावून त्यात पीठ ओतलं तरी नंतर ढोकळ्यासारख्या वडया पाडता येतात .  याच पिठात थोडं ताक घालून भिजवून उत्तप्पा करता येईल .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *