रव्याची इन्स्टट खिचडी

साहित्य :

१)       दोन वाटया रवा

Rava Upma Khidhadi Recipe
Rava Upma Khidhadi Recipe

२)      पाव वाटी तूप , साखर

३)      एक चमचा जिरं

४)     चार-पाच हिरव्या मिरच्या

५)     एक-दोन वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट

६)      चवीनुसार मीठ .

कृती :-

१)       रवा कोरडाचं खमंग भाजून घ्यावा .  तुपाची फोडणी करून मिरच्यांचे       तुकडे घालावे .

२)     त्यात रवा , मीठ , साखर घालून नीट कालवावं .  गार झाल्यावर डब्यात    भरून ठेवावं .

३)     खिचडी करण्याच्या वेळी एक वाटी मिश्रणाला दीड वाटी उकळत पाणी घालून     एक वाफ आणावी .

४)     बटाटे घालायचे असतील तर रात्री बटाटे उकडून ठेवावे .  सकाळी फोडींना थोडं तिखटमीठ लावून मिश्रणाला घालाव्या .

५)    मायक्रोवेव्ह असेल तर मिश्रण आणि पाणी करून दोन-तीन मिनिटं         मायक्रो करावं .