गोड शिरा
|
साहित्य :-
१) दोन वाटया रवा
२) दोन वाटया साखर किंवा सव्वादोन वाटया पिठीसाखर
३) अर्धी वाटी तूप
४) एक चमचा वेलचीपूड
५) चिमुटभर मीठ .
कृती :-
१) तुपावर रवा खमंग भाजून घ्यावा . गार झाल्यावर साखर , वेलचीपूड , मीठ मिसळून डब्यात भरावा .
२) फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही . महिनाभर बाहेर टिकतो . मायक्रोवेव्हमध्ये करायचा असेल तर साधी साखरही मिसळली तरी चालेल .
३) यातलं एक वाटी मिश्रण घेतलं तर एक वाटी पाणी (किंवा अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दुध) उकळून त्यात हे मिश्रण टाकावं .
४) ढवळून एक वाफ दिली की साधारण दोन माणसांसाठी शिरा होतो .
५) मायक्रोवेव्हमध्ये सुध्दा मिश्रणाएवढंच पाणी घालून शिरा शिजवावा . उकळत्या पाण्याची गरज नाही .