तांदळाची इडली

साहित्य :Idli

१)      एक वाटी उडीद डाळ

२)     एक वाटी जाड तांदूळ

३)     एक वाटी उकडा तांदूळ

४)     अर्धा चमचा मेथी दाणे

५)    चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घालावे .  दोन्हीत थोडे थोडे मेथी दाणे  घालावे .  पाच-सहा तासानंतर तांदूळ रवाळ वाटून घ्या .

२)     डाळ एकदम बारीक वाटावी .  डाळ वाटून होत आली , की त्यात तांदूळ मिसळून परत बारीक वाटावी .

३)     वाटताना लागेल तसं पाणी घाला .  पीठ डावातून सहज पडेल असं हवं .

४)     मीठ मिसळून मोठया पातेल्यात झाकून उबेच्या जागी रात्रभर जवळजवळ अडीचपट फुगेपर्यंत ठेवा .

५)    सकाळी कुकरमध्ये पाणी उकळत ठेवा .  इडलीपात्राच्या वाट्यांना तेलाचा हात लावून प्रत्येकात डावानं अर्धी वाटी भरेल एवढं पीठ घाला .

६)      पातेल्यातलं पीठ अजिबात न ढवळता , कडेकडेनं पीठ काढा .  म्हणजे फुग मोडणार नाही .  सात-आठ मिनिटात इडल्या उकडून होतील .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *