रुपया अन आपण

जानेवारी २०११ मध्ये एका डॉलरसाठी ४३ रुपये मोजावे लागत होते,rupees_dollar आज एका डॉलरसाठी ६६ रुपये ५५ पैसे मोजावे लागत आहेत. डॉलरची किंमत रुपयाच्या मानाने अधिक असण्याचे कारण म्हणजे अमेरिका निर्यात जास्त प्रमाणात करते आणि त्या तुलनेत आयात कमी करते. भारताची स्थिती नेमकी उलट आहे भारत निर्यात कमी प्रमाणात करते आणि त्या तुलनेत आयात जास्त करते.आपण जी आयात करतो त्याचे मुल्य डॉलर मधेच द्यावे लागते. एक डॉलर मिळविण्यासाठी ६६.५५ रुपये लागतात . पण डॉलर कितीही महाग झाले तरी ते आपल्याला घ्यावेच लागतात . कारण तेलाची आयात करून त्या मोबदल्यात तेल उत्पादक देशांना पैसे रुपयात देऊन चालत नाही तर त्यांना डॉलरमधेच द्यावे लागतात .

मे महिन्यापासून रुपयाच्या किमतीत किमान २८ टक्क्यांची घसरण झाली आहे . रुपयाची जी प्रचंड घसरण सुरु आहे त्याचा फटका सर्व राज्यांच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे . रुपयाची घसरण पाहता ऑटोतोमोबाईल सारख्या उद्योगांमधील रोजगारांवर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . खोलात चाललेल्या रुपयामुळे महागाई वाढत असून टि .व्हि., फ्रीज , वाशिंग मशीन तसेच वाहनेही महागणार आहेत.
रुपयाच्या तुलनेत चढत्या दरांच्या स्पर्धेत उतरत सोन्याने नव नवे उच्चांक गाठणे सुरु केले आहे. अन रुपयाच्या निचांकामुळे आयात करण्यात येणाऱ्या सर्वच वस्तूंसाठी अधिक रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे महागाई भस्मासुरासारखी वाढत चालली आहे.

गोदरेज अप्लायन्सेस आणि हायर या कंपन्यांनी सप्टेंबर पासून इलेक्ट्रोनिक वस्तूंच्या किमतीत ४ ते ७ टक्क्यांनी वाढ करण्याचे ठरवले आहे.सॅमसंगने नुकतीच मोबाईल अन टबलेटच्या किंमतीत वाढ केली असून लवकरच गृहोपयोगी वस्तूंच्या किमतीतही वाढ करण्याचा विचार कंपनीने बोलून दाखविला आहे. जनरल मोटरही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बिट ,सेल,आणि एन्जॉय या गाड्यांच्या किमती २ ते १० हजार रुपयांनी वाढवणार आहे. जगातील विविध देशांमधील चलनांसमोर रुपयाने नांगी टाकल्यामुळे डॉलर सोबतच या देशांमधून आयात होणार्या वस्तुंच्याही किमती वाढणार आहेत. अन आगामी काळात महागाईचा फटका सर्वांनाच बसणार आहे. अन डॉलर ची किंमत वाढल्यामुळे डीझेल व पेट्रोल च्या किमतीत वाढ होणे अटळ असल्यामुळे वाहतूक खर्च वाढेल अन परिणामी सर्व स्तरातून महागाई वाढेल .

‘डॉलर’ची किंमत वाढल्यामुळे डिझेल आणि पेट्रोल यांचे भाव वाढतात. कारण ते विकत घेण्यासाठी आयातदारांना एका’डॉलर’पाठीमागे अधिक पैसे मोजावे लागत असतात. रॉकेल,पेट्रोल, डिझेल आणि गॅस महागले की, जीवनातील प्रत्येक गोष्ट महाग होते. कच्चे तेल, खाद्य तेल, डाळी, औषधे, कोळसा, खते या सर्व गोष्टी महागतात. भारताची आयात मोठी आहे त्यामुळे ज्या वस्तू भारत आयात करतो त्यांसाठी अधिक पैसे मोजावे लागतात व आयातखर्च वाढला की, त्याच्या विक्री मूल्यात वाढ होते. तसेच उत्पादन खर्चातही वाढ होते. वाढत्या उत्पादन खर्चामुळे आस्थापनांना कर्मचारी कपात किंवा वेतन कपात करावी लागते. परिणामी महागाई, बेरोजगारी, गरिबी या सगळ्यात कमालीची वाढ होते.

रुपयाची किंमत सुधारायची असेल तर आपल्याला आयात कमी आणि निर्यात अधिक करावी लागेल. निर्यातीसाठी उत्पादन आणि त्याची गुणवत्ता वाढवावी लागेल. त्यासाठी देशातील मुख्य अशा शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन शेतमालात वाढ करणे गरजेचे आहे. नैसर्गिक साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे . पेट्रोल , डीझेलवरच अवलंबून राहण्यापेक्षा नवीन उर्जास्त्रोत्रांचा शोध घेणे आवश्यक आहे. तसेच ज्ञात असलेल्या नैसर्गिक उर्जास्त्रोत्रांचा जसे सौर उर्जा सारख्या नैसर्गिक उर्जास्त्रोत्रांचा जास्तीत जास्त वापर करून घेणे गरजेचे आहे.

One Comment