मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया २०१३

आपल्या सभोवतालच्या अनेक व्यक्तींना विविध प्रकारचे छंद असतात. dal methi
काहींना त्यांनी जोपासलेले छंद मान-सन्मानही मिळवून देतात. मात्र हा सन्मान परदेशात मिळत असेल तर त्याचे महत्व काहीतरी ‘आगळे’ असते. कोल्हापुरातील शाहूपुरीत राहणाऱ्या हृषीकेश रमेश देसाई यांच्या जिवनात असाच प्रसंग आला.
हृषीकेशला खाण्याचा आणि खाऊ घालण्याचा ‘खवय्या’ छंद आहे. नुसते हॉलमध्ये बसून टीव्ही बघण्यापेक्षा त्याला किचनमध्येच काहीतरी करण्याची भारी हौस. घरातील लोक त्याच्या हातचे उकडीचे मोदक खाण्यासाठी संकष्टी चतुर्थीची वाट बघत बसायचे. त्याने बनविलेल्या तांबड्या रस्सा आणि सुक्या मटणाचा वासाने शाकाहारी लोकांच्याही तोंडाला पाणी यायचे. त्याने पॉलिमर इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियात चांगली नोकरी मिळवली. मात्र  त्याने आपला छंद सोडला नाही. ऑस्ट्रेलियातील आपल्या मित्रपरिवाराला तो सतत नवनवीन पदार्थ बनवून खाऊ घालायचा. त्याने बनविलेल्या तांबड्या रश्शाने त्याच्या मित्रपरिवाराला चांगलीच भूरळ घातली. त्याचा हाच छंद त्याला सात समुद्रापार ‘मास्टरशेफ  ऑस्ट्रेलिया २०१३ ’चा सन्मान मिळवून देऊ शकतो. कारण ह्या स्पर्धेसाठी तो पात्र ठरलाय!
दर्जेदार शेफनाच ह्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळते. ही स्पर्धा जगभर प्रसीद्ध आहे. ऑस्ट्रेलियातील टीव्हीवर ती विशेष लोकप्रिय आहे. त्या देशातील एक मानाची पाककृती स्पर्धा म्हणून तिचा लौकिक आहे. ह्या स्पर्धेतील स्पर्धकाला अनेक फेऱ्या पार कराव्या लागतात. आतापर्यंत झालेल्या फेऱ्यांमध्ये हृषीकेश ‘हिरो’ ठरला आहे. मात्र, ‘मास्टरशेफ  ऑस्ट्रेलिया २०१३ ’ चं किताब मिळविण्यासाठी त्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मात्र हृषीकेशला स्वतःविषयी कमालीचा आत्मविश्वास वाटतो.

More Information on :-  http://www.masterchef.com.au/rishi-desai.htm

One Comment