साबुदाणा खिचडी
|१) दोन वाट्या साबुदाणा
२) एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
३) सहा-सात हिरव्या मिरच्या
४) चवीला मीठ , साखर , पाव वाटी तूप
५) एक चमचा जिरं , एक चमचा लिंबाचा रस .
कृती :-
१) साबुदाणा आठ-दहा तास भिजवावा . साबुदाणा धुतल्यानंतर थोडं वरती दिसेल इतकं पाणी ठेवावं म्हणजे साबुदाणा चांगला भिजतो .
२) तुपाची फोडणी करून मिरच्यांचे तुकडे घालून परतावे .
३) साबुदाण्यात मीठ , साखर , शेंगदाण्याचा कूट , लिंबाचा रस आणि फोडणी घालून कालवावं .
४) हे मिश्रण दोन-तीन दिवसच ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये नाही तर फ्रीजरमध्ये ठेवावं .
५) फ्रीजमधील मिश्रण काढून कुकरमध्ये एका ताटलीवर पसरून दोन-तीन मिनिटं वाफ दिली , की खिचडी तयार होते .
६) मायक्रोवेव्ह असेल तर दोन वाट्या मिश्रण झाकण ठेवून तीन-चार मिनिटं मायक्रो केलं तर मऊ मोकळी खिचडी तयार . ( दीड वाटी मिश्रणाची दोन प्लेट खिचडी होते . )
७) मिश्रण फ्रीजमधून काढल्यास ते घरातल्या तापमानाला आलं की एक वाफ द्यायची .
मायक्रोवेव्हमध्ये पहिल्यांदा डीफ्रास्त करायचं आणि मग झकण ठेवून वाफ द्यायची
VAA! MASTACH..PAHTAKSHANI TONDALA PAANI SUTLE.