साबुदाणाचे वडे
|साहित्य :-
१) दोन वाटया भिजवलेले साबुदाणे
२) चार मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
३) एक वाटी शेंगदाण्याचा कूट
४) चार ते पाच हिरव्या मिरच्या
५) एक चमचा जिरे
६) तळण्यासाठी तेल
७) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) भिजवलेले साबुदाणे , शेंगदाण्याचा कूट व उकडलेले बटाटे कुस्करून एकत्र करावेत .
२) तयार केलेल्या मिश्रणात हिरवी मिरची बारीक चिरून एकत्र करून घ्यावी .
३) एक चमचा जिरे टाकून या मिश्रणात चवीपुरते मीठ टाकावे व त्याचे चपटे गोळे बनवून तेलात तळावेत .