सचिन तेंडूलकरचे आयपीएल ला ‘गुड बाय!’
|सचिन तेंडूलकर! आपल्या ‘सचिन’ यार!
आता आयपीएल मधूनही निवृत्ती घेतली म्हणे त्याने! कालच मुंबईने चेन्नईला फायनल मध्ये मारलं ना, तेव्हाच सांगितलं त्यानं! एवढं वय असूनही काय खेळायचा यार तो? ७८ सामन्यांमध्ये २३३४ रन कुटले त्याने! काय शॉट असायचे एकाहून एक! थोडक्यात काय, तर हा ‘टी-२०’ क्रिकेट ना म्हणे तरुणांचा खेळ आहे, तिथे वयस्कारांचा टिकाव लागणार नाही! क्रिकेटमध्ये तरुण म्हणजे तीसच्या आतले, वयस्कर म्हणजे तिशी ओलांडलेले! त्यात आपला सचिन चाळीशीतला!
अगदीच गेलसारखं नाही, पण सचिनसारखंच खेळायचा ‘सचिन’! असो, प्रत्येकालाच कुठेतरी थांबावं लागतं, सचिनही थांबला. योग्य वेळ पाहून. क्रीकेटमधले सगळेच स्वप्न पूर्ण केलेत त्याने! त्याच्या कारगीर्दीत भारतानं वर्ल्ड कपही जिंकला आता मुंबई ने आयपीएल! एकदिवसीय क्रिकेटमधून तर याआधीच निवृत्ती घेतली, आता आयपीएलमधूनही!
मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा खेळ पहायला मिळणार! त्यात खेळतोय ना तो अजून 🙂
Sachin is a great.
Ha nirnay nakkich shahanpanacha ahe.