सचिन आता ‘बॅडमिंटन’मध्ये….!
|आपल्या सचिन ने रिटायरमेंट नंतर एक सॉलिड प्लान बनवला आहे! तो एका बॅडमिंटन टीमचा मालक होणार आहे! ‘आयपीएल’ला मिळालेलं भन्नाट यश पाहून हैदराबादच्या पीव्हीपी समुहाने ह्याचं धर्तीवर ‘इंडियन बॅडमिंटन लीग’ अर्थात आयबीएल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या लीग मध्ये एकूण सहा टीम असतील. ह्यांतील एका टीमचा मालक आपला मास्टर ब्लास्टर असणार आहे. हि स्पर्धा १४ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान होइल. सचिनची टीम ह्या स्पर्धेतील आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल यांत शंकाच नाही. पीव्हीपी समुहाच्या आयबीएलसाठी स्पोर्टी सोल्युशन ही कंपनी स्पर्धा आयोजनाची जबाबदारी सांभाळणार आहे. स्पोर्टीचे सीईओ आशिष चढ्ढा यांनी आयबीएल संदर्भातल्या अनेक रहस्यांवरील पडदा लवकरच उघडेल, अशी माहिती दिली.
पहिल्या आयबीएलसाठी दहा लाख डॉलरचे पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेतील सामने मुंबई, पुणे, नवी दिल्ली, लखनऊ, हैदराबाद आणि बेंगळुरू या सहा शहरांमधून खेळवले जातील. सायना नेहवाल, ज्वाला गुट्टा, पी. व्ही. संधू, अश्विनी पोनप्पा, पारुपल्ली कश्यप हे या स्पर्धेतील स्टार खेळाडू असतील. खेळाडूंचा लिलाव ३० जून रोजी होणार आहे.