संजय दत्त टाडा न्यायालयाला शरण……!
|दैनिक महाराष्ट्र टाईम्स च्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, सिनेअभिनेता संजय दत्त आज दुपारी अडीच वाजता टाडा न्यायालयास शरण आला.
सविस्तर बातमी येथे वाचा.
१९९३ साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी त्याला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याआधी तीन टप्प्यात त्याने दीड वर्षांची शिक्षा भोगलेली असून उरलेली साडेतीन वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी तो आज न्यायालयात हजर झाला. त्याच्या समवेत त्याची बहिण खा. प्रिया दत्त, पत्नी मान्यता दत्त, सिने दिग्ददर्शक महेश भट्ट हेदेखील उपस्थित होते. न्यायालयाने संजय दत्तला तुरुंगात एक महिना घरचे जेवण आणि औषधे घेण्याची परवानगी दिली मात्र त्याचवेळी सिगारेट पिण्यास मनाई केली आहे. त्याच्या घराबाहेर तसेच न्यायालायाबाहेरही त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.