संजय दत्तची याचिका फेटाळली, कारागृहात रावानगी…
|सिने अभिनेता संजय दत्तने अवैधशस्त्र बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनाविल्याच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेली पुनर्विचार याचिका आज सर्वोच्च न्यालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे येत्या १५ मी रोजी संजय दत्तला कारागृहात जावेच लागेल. पाच वर्ष सुनावलेल्या शिक्षेपैकी संजय दत्तने यापूर्वी दीड वर्षांचा कारावास भोगलेला आहे, त्यामुळे त्याला उरलेल्या साडेतीन वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात जावे लागेल. न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे संजय दत्तला घेऊन काम करणाऱ्या सिने निर्मात्यांचे मात्र चांगलेच धाबे दणानलेले आहे .