वृक्षवल्ली आम्हा सोयरे फक्त म्हणायचे कि तसे वागायचे ही

असं म्हटलं जातं की, जेव्हा मानवाने ह्या भूतलावर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हापासूनच निवाऱ्याकरिता मानवाने वृक्षतोडीस सुरुवात केली.vruksh विविध कारणांसाठी केली जाणारी ही भरमसाट वृक्षतोड आता इतकी वाढली आहे कि यामुळे जंगलेच नष्ट होतात कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. वातावरणाच्या तापमानात वाढ झाल्याने त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावरही व्हायला लागला आहे.

वृक्षतोडीमुळे जल, स्थल आणि वायूप्रदूषणही वाढले आहे. मानवाने जंगलांवर कब्जा केल्याने वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहेच, मात्र पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. मानवाला पिण्यायोग्य पाण्याचा मुख्य स्त्रोत ‘पाऊस’ असल्याने दुष्काळाची समस्या जाणवू लागली आहे. प्रदूषणामुळे बहिरेपणा, डोळ्यांचे विकार, श्वसनाचे आजार, हृदयविकार अशा आजारांत वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळते

हिमालयातील वृक्षतोडीचा भारतातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या गंगा नदीलाही फटका बसला आहे. ज्या हिमनदीतून गंगा उगम पावते ती हिमनदीच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच उत्तराखंड राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा संबंध तेथील वृक्षतोड, खाणकाम आणि डोंगरं उध्वस्त करून केलेल्या बांधकामाशी जोडला गेला आहे. निसर्गावर हल्ला करून आपले साम्राज्य प्रस्थापित करू पाहणारा मानव असे करून आपलेच अस्तित्व धोक्यात घालत आहे.

One Comment