इन्स्टट शेवया
|
साहित्य :-
१) दोन वाटया जाड शेवया
२) अर्धी वाटी ओलं खोबरं
३) दोन मोठे चमचे तेल
४) दोन-तीन लाल सुक्या मिरच्या
५) फोडणीसाठी मोहरी , हिंग
६) चवीपुरतं मीठ .
कृती :-
१) शेवया कोरडयाच खमंग भाजाव्या . तेलाची फोडणी करून फोडणीत लाल मिरच्या आणि खोबरं घालून लाल होईपर्यंत परतावं .
२) नंतर शेवया , मीठ साखर घालून परतावं . गार झाल्यावर शेवया डब्यात भरून ठेवाव्या .
३) शेवया करायच्या वेळी एक वाटी मिश्रण- एक वाटी उकळत्या पाण्यात घालून एक वाफ आणावी .
४) मायक्रोवेव्हमध्ये एक वाटी मिश्रणाचा साधारण दोन प्लेट उपमा तीन-चार मिनिटात होतो .