मोबाईल चार्ज करणाऱ्या शॉर्टस….

वैज्ञानिक काय शोध लावतील याचा नेम नाही. shortsआता मोबाईलची बॅटरी चार्ज करणाऱ्या अनोख्या शॉर्टस म्हणजेच विजारींचा शोध लावला आहे. दैनिक ‘सकाळ’ च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार अशा प्रकारच् मोबाईल चार्ज करणाऱ्या शॉर्टस…. या विजारींमध्ये ऊर्जा साठवता येऊ शकते व त्यातून त्या विजारी घालणारा चालत असताना त्याच्या मोबाईलची बॅटरी चार्ज होऊ शकते!
सामन्यतः माणूस जेव्हा या पॉवर शॉर्ट्स घालून फेरफटका मारण्यासाठी जातो तेव्हा चार तास बॅटरी चालेल एवढी ऊर्जा तो निर्माण करतो, असे ‘सन’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
एका धाग्याच्या साह्याने चालण्याच्या ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रुपांतर करणे शक्य झाल्याने हे घडते. चालताना कपड्यांमधील धाग्यांमध्ये घर्षण होते आणि त्यातून जी ऊर्जा तयार होते ती मोबाईल चार्जिंगसाठी वापरली जाते.
एका मोबाईल कंपनीचे संपर्क संचालक ख्रिस्तियन कल म्हणाले, बाहेरगावी गेल्यावर चार्जिंगच्या संबंधित येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यवहार्य पर्याय निर्माण करण्याची आमची महत्त्वाकांक्षा होती. ती साध्य झाली.