कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामैय्या यांची निवड

karnatakaकाँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्यासाठी बरीच चढा-ओढ चाललेली होती, मात्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या यांची निवड करण्यात आली आणि ह्या चढाओढीस पूर्णविराम मिळाला. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये सिद्धरामय्या आणि मल्लिकार्जुन खाडगे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती.

वरिष्ठ मंत्री अ. के. एंथोनी, काँग्रेसचे राज्य प्रभारी मधुसूधन मिस्त्री, कर्नाटक स्क्रिनिंग समितीचे अध्यक्ष लुईजिन्हो फलेरो आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी काँग्रेस पर्यवेक्षकांची भूमिका निभावली.