त्वचेची काळजी कशी घ्यावी ?

१)      त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक योग्य आहार , पुरेशी झोप , भरपूर पाणी , सौम्य व्यायाम व शांत स्वभाव याची आवश्यकता असते .  त्वचा मुलायम व सुंदर दिसण्याची जणू चार सूत्रे आहेत .

Skin Care Article in marathi
Skin Care Article in marathi

२)     रोजच्या रोज क्लिन्झिंग , टोनिंग , मॉइश्चरायझिंग आणि कंडीशनिंग ची गरज असते .

३)     त्वचेची निगा म्हणजे त्वचेची स्वच्छता दररोज करायला हवी .  यामध्ये मेकअप काढणे , रोमछिद्रे स्वच्छ करणे , मृतपेशी काढून टाकणे हे करावे लागते .  टोनिंग केल्याने त्वचेला नवीन चैतन्य प्राप्त होते .  रक्तप्रवाह सुरळीत चालल्यामुळे त्वचा कांतिमान दिसते .  मॉइश्चरायझर केल्याने त्वचेचा ओलसरपणा कायम ठेवला जातो .  तर कंडीशनिंगमुळे त्वचेतील आम्लाचा समतोल राखला जाऊन इतर असमतोल दुरुस्त होण्यास मदत होते .

४)     आपण बऱ्याचदा पार्लरमध्ये जाऊन चेहऱ्याचा मसाज करून घेतो , परंतु रोज घरच्या घरी जर सकाळच्या वेळीस मॉइश्चरायझर व रात्रीच्या वेळेस कंडीशनर लावताना मसाज केल्यास त्वचेवरील छिद्रे निरोगी राहून उत्सर्जित ग्रंथीच्या कार्यात वाढ होते .  यामुळे अपोआपच त्वचा स्वच्छ राहते .  मसाज प्रत्येक छोटया पेशीला चैतन्य देते .  रक्तप्रवाह व्यवस्थित होऊन स्नायू मुलायम होतात .  त्वचा घट्ट , सतेज व मुलायम बनते .

मसाज करताना चेहऱ्याच्या खालच्या बाजूने सुरुवात करून वरच्या बाजूने बाहेरच्या दिशेने करावी .  डोळ्याभोवती अतिशय नाजूक हाताने मसाज करावी .