झणझणीत मटण

साहित्य :-spicy_mutton

१)      एक किलो मटण

२)      अर्धा किलो कांदे

३)      दोन बटाटे , दोन इंच आले

४)      एक मोठा चमचा लसणीचा कांदा

५)      चार ते पाच मिरच्या

६)      अर्धी वाटी कोथिंबीर , लवंग

७)      तीन चाथुर्थांश चमचा हळद

८)      दोन चमचे तिखट , दोन वेलची

९)      दोन चमचे गरम मसाला

१०)  एक ते दीड वाटी तेल

११)  दोन तुकडे दालचिनी

१२)  अर्धा चमचा शहाजिरे

१३)  चवीपुरतं मीठ .

कृती :-

१)      तेलामध्ये लवंग , दालचिनी , वेलची , शहाजिरे फोडणीला टाकून त्यावर कांदा परतावा .

२)      मटणाला हळद व आले , लसूण , मिरची-कोथिंबीरीची गोळी लावून ठेवावी .  नंतर हे मटण कांदयावर टाकून चांगले परतावे .

३)      तिखट , मसाला , बटाट्याच्या फोडी टाकून मीठ टाकावे व जरा जास्तच पाणी टाकून कुकरमध्ये शिजवावे .

४)      तिखटाचा रंग लाल पाहिजे म्हणजे रश्श्यालाही तसा छान रंग येतो .  गरम रस्सा पिण्यास चवदार लागतो व मजा येते .

One Comment