तळगड
|मुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या अलीकडे इंदापूरजवळ तळगावाकडे जाण्यासाठी फाटा आहे.
रोह्याला अनेक डोंगररांगांनी वेढलेले आहे. ह्या डोंगरराजीत अनेक किल्ले असून “तळगड” हा त्यापैकीच एक आहे.
रोहा समुद्राजवळच आहे. म्हणूनच ह्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची बांधणी केली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी तळगड व घोसाळगड स्वराज्यात सामील करवून घेतले. नंतर, मिर्झाराजे जयसिंगांसोबत झालेल्या तहात स्वतःकडे ठेवलेल्या बारा किल्ल्यांपैकी एक म्हणजे “तळगड”. पुढे १८१८ साली इंग्रज अधिकारी जनरल प्राथरने हा किल्ला स्वराज्यापासून हिरावून घेतला. किल्ल्याची तटबंदी तसेच अनेक बुरुज आजही सुस्थितीत असून किल्ल्यावरून घोसाळगड, महाड तसेच रोह्याची खाडी असा परिसर सहजरीत्या व्यवस्थित बघता येतो. किल्ल्यावर निवासाची व्यवस्था नाही, मात्र तळगावात असून तेथून किल्ल्यावर केवळ अर्ध्या तासात पोहोचता येते.
nice,