तंदूर चिकन

तंदूर चिकन 

tandoori-chicken
tandoori-chicken

साहित्य :-

१)      एक लहान कोवळी चिकन

२)      एक चमचा आले-लसूण गोळी

३)      दोन चमचे वाटलेली कच्ची पपई

४)      अर्धा टेबल स्पून ऑरेंज कलर

५)      दोन चमचे दही , तंदूर भट्टी

६)      एक टेबल स्पून काश्मिरी मिरची पावडर

७)      अर्धा चमचा धने-जिरे पावडर

८)      एक चाथुर्थांश चमचा गरम मसाला

९)      एक चमचा तेल किंवा तूप

१०)  चवीला मीठ .

कृती :-

१)      चिकनला चार ते पाच चिरा पाडाव्या .  दह्यात रंग , तिखट , धने-जिरे पावडर व मीठ टाकून ते मिश्रण चिकनला चोळून चार ते पाच तास फ्रीजमध्ये ठेवावे .

२)      नंतर सळीला चिकन अडकवून भट्टीत भाजणे .  शिजल्यावर थोडेसे तूप सोडून वर गरम मसाला चोळून परत दोन मिनिटे भट्टीत धरून काढावी .

३)      तंदूर भट्टी नसल्यास चार किलो डालडाचा डबा घ्या .  त्या डब्याचा वरचा व खालचा गोलाकार भाग काढून टाकल्यावर डबा पोकळ राहिल .

४)      तो डबा गैसवर ठेवावा .  व त्यावरून कोंबडी लावलेली शिग ठेवावी म्हणजे चिकन सगळीकडून भाजून निघेल .  परोठा व नान भाजायचा असल्यास हीच घरगुती        भट्टी उपयोगी पडेल .

3 Comments