टाटांची ‘नॅनो’ गिनीज बुकात…

  आपल्या टाटांच्या नॅनो कारने गिनीज बुकांत स्थान मिळविले आहे. कुठल्याही भारतीयाच्या दृष्टीने अभिमान वाटावा अशी हि गोष्ट आहे. ह्या पराक्रमाकरीता टाटा उद्योग समूहाचे प्रथमतः अभिनंदन! tata nano
              गिनीज बुकांत स्थान मिळविण्यासाठी नॅनो कारने दहा दिवस कन्याकुमारी ते बेंगळुरु असा दहा हजार २१८ किमी लांबीचा प्रवास केला.   टाटा मोटर्सचे अध्यक्ष रणजित यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार बेंगळुरु येथील श्रीकारुण्य सुब्रह्मण्यम यांच्या टीमने २१ ते ३० मार्च या कालावधीत ही मोहीम पार पाडली. यापूर्वी या कारने आठ हजार ४६ किमीचा पल्ला गाठला होता. आपल्या दणकट , विश्वासार्ह आणि इंधनबचतीच्या तंत्रज्ञानामुळे टाटा नॅनोने देशाचे नाव गाड्यांच्या जागतिक नकाशावर झळकावले असल्याचेही यादव यांनी सांगितले.
               टाटा नॅनोने एवढ्या लांबीचा प्रवास पूर्ण केल्यामुळे एफवन ड्रायव्हर नारायण कार्तिकेयन याने सुब्रह्मण्यम यांच्या टीमचे यावेळी अभिनंदन केले. तसेच याप्रसंगी कार्तिकेयन याच्या हस्ते थॉमस चॅको यांच्या ‘ ऑटोप द वर्ल्ड ‘ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ६३ वर्षीय चॅको यांनी जुलै २०१२मध्ये नॅनो कारने ७८ दिवसांचा प्रवास केला होता. 

One Comment