दूरसंचार आणि आपण..

दूरसंचार आणि आपण….telecom. दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीमुळे मानवाने आपल्या विकासात एक पाउल आणखी पुढे टाकलेले आहे.

ही क्रांती कामाचा वेग वाढविण्यासाठी तसेच एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी त्वरीत संपर्क होण्यासाठी महत्वाचा दुवा ठरली आहे. साधारणतः २०-२५ वर्षांपूर्वी दूरध्वनी केवळ उच्चभ्रू लोकांकडे, अथवा व्यापारी प्रतिष्ठाने किंवा आस्थापना इथेच आढळत. मात्र आता सामान्यातल्या सामान्य व्यक्तीकडे देखील भ्रमणध्वनीसंच असल्याचे आढळून येते. याचे कारण, पूर्वीच्या कॉलरेटपेक्षा आत्ताचे कॉलरेट कित्येक पटींनी स्वस्त झाल्याचे आढळून येते. परिणामतः सर्वसामान्य व्याक्तीलादेखील दूरध्वनी बाळगणे शक्य झालेले आहे. पूर्वी एखादया व्यक्तीला दुसऱ्याशी संपर्क साधण्याकरीता पत्रव्यवहारासारख्या वेळखाऊ साधनाचा आधार घ्यावा लागे किंवा त्याव्यक्तीची प्रत्यक्ष भेट घ्यावी लागे जी एक खर्चिक बाबदेखील होती. मात्र, आता दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीच्या सहाय्याने त्वरीत संपर्क साधने शक्य झाले आहे. पूर्वी केवळ महत्वाच्या कामासाठीच दूरध्वनीचा वापर होत असे, आता मात्र स्वस्त कॉलरेटमुळे काम महात्वाचे असो वा नसो, त्वरीत संपर्क केला जातो. दूरसंचार माध्यमांमुळे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या खूपच जवळ आली असून , ही माध्यमे मानवाची नितांत गरज बनली आहे.

2 Comments