पावसाळ्यात वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी….

पावसाळ्यात वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी….rain

पावसाळ्यात गाडी चालवितांना चालकाने खालील सूचनांचे पालन केल्यास फायदेशीर ठरू शकते. वादळी वातावरणात रस्त्यावरील इतर वाहने, रस्त्यावरील चिन्हे आणि रस्ताही दिसणे अवघड होऊन बसते.

१.      सर्वांत महत्वाचे म्हणजे वे मर्यादित ठेवा. पावसाळ्यात गाडीचा ब्रेक लागण्यास वेळ लागतो.

२.      गाडी रस्त्याच्या मध्यभागी चालवा, कारण पाणी रस्त्याच्या बाहेरील बाजूस साचते.

३.      पुढिल व मागील वाहनात योग्य अंतर ठेवा.

४.      तुमच्या पुढील गाडीच्या रांगेतच गाडी चालवा.

५.      मोठी वाहने जसे ट्रक अथवा बसेस यांच्या मागून अतिशय जवळून गाडी चालवू नका. ह्या वाहनांची चाके मोठी असल्याने रस्त्यावरील चाकाखाली आल्यावर मोठे फवारे उडतात, ज्याने रस्त्यावरील इतर गोष्टी दृष्टीस पडणे अवघड होते.

६.      पावसाळी अथवा निसरड्या परीस्थितीत वाहन चालवितांना जास्त सतर्क रहा. तुमच्या पुढे चालणाऱ्या वाहनाच्या ब्रेक लाईट वर बारकाईने लक्ष ठेवा.

७.      ब्रेकचा वापर करणे टाळा. त्यापेक्षा, तुमच्या गाडीचा वेग हळुवार ठेवा.

८.      जरी तुम्ही गाडी दिवसा चालवत असाल, तरीही ढगाळ, हलक्या पावसाच्या किंवा धुक्याच्या वातावरणात गाडीचे हेड लाईट चालू ठेवा. ते तुम्हाला रस्त्या दिसण्यास मदत करेलच, मात्र इतर वाहनांनाही तुमची जाणीव करून देईल.

९.      पावसाला सुरु होण्यापूर्वी जीर्ण झालेले ठिसूळ व्हायपर्स बदलून टाका.

१०.  ऑफ रोड ड्रायव्हिंग टाळा. रस्त्याबाहेरील खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज करणे अवघड असते.

११.  वाहत्या पाण्याखाली जमीन दिसत नसल्यास त्यातून गाडी चालवू नका.

१२.  अनिश्चित खोलीच्या डबक्यांमधून मधून वाहन चालवितांना सावकाश जा. दाब्क्याची खोली जर तुमच्या वाहनाच्या दरवाजाच्या तळापेक्षा जास्त असेल, तर दुसरा मार्ग शोधा.

6 Comments