तुझ्या दिलेल्या वचनांचे ….!
|
तुझ्या दिलेल्या वचनांचे
एक एक काळे मणी
अंतरात जपून
ठेवले आहेत …….!
तूला आठवतही नसेल आता
पण एकत्र घेतलेल्या अगणित
श्वासांची शपथ…..!
तुझ्या बरोबर चालेल्या
प्रत्येक पावलात सप्तपदींचे
मंत्र जपत होते……!
तू परतणार नाहीस
तरीही
तुझ्या नावानेच
आयुष्याचा उत्सव साजरा
करणार आहे…!
तू नसतांना … पण तरीही
कुठेतरी तुलाच शोधतांना
अंतरगाभा-यात प्राण तेवत
आहे…!
2 Comments
NICE
nice