तुकोबारायंची पालखी २९ जूनला मार्गस्थ होणार….

tukaram_maharajपावसाळा सुरु झाला की वारकऱ्यांना वेध लागतात पंढरपूरच्या वारीचे. पावसाळ्यातच येणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतात. दरवर्षी लाखो वारकरी ‘ज्ञानबा तुकाराम’चा गजर करीत, अभंग म्हणत, प्रवचन-कीर्तन करीत पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होतांनाही दिसतात. त्यांना साथ असते ती जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची. संत तुकाराम महाराजांची पालखी त्यांचे गाव श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होते, तर संत ज्ञानेश्वरांची पालखी श्रीक्षेत्र आळंदी येथून. यंदाच्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा कार्यक्रम जाहीर झाला असून पालखी परंपरेप्रमाणे ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला म्हणजेच २९ जून रोजी देहूतून पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. पालखीचा पिंपरीतील मुक्काम रद्द करण्यात आला असून पुणे आणि इंदापूर येथे दोन दिवस मुक्काम ठेवण्यात आला आहे. आषाढ शुक्ल एकादशीला, १९ जून रोजी पालखी पंढरपुरात दाखल होईल. तेथे चार दिवस मुक्काम करून पालखी २२ जूनला परतीचा प्रवास सुरु करेल.  

2 Comments

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *