उन्हाळी काकडी भात

साहित्य :- kakdi

१) एक वाटी तांदळाचा शिजवलेला भात 

२) दोन मोठया काकड्या चोचून 

३) सायीचं दही दीड वाटी 

४) गरजेनुसार दुध 

५) मीठ-साखर 

६) आल्याचा कीस एक चमचा 

७) दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून 

८) कढीपत्ता , कोथिंबीर , तेल , फोडणीच साहित्य .

कृती :- 

१) भातात दही , दुध , साखर , मीठ आणि आल्याचा कीस घालून कालवावं .

२) तेलात जिरं , मोहरी , हिंग , कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून ती फोडणी भातात घालावी .  

३) शिवटी काकडी आणि कोथिंबीर घालून भात वाढवा .