उसळ दलिया

साहित्य :-

१)      अंगाबरोबर रस असलेली एखादी चमचमीत उसळ एक  वाटी (उदा. छोले , मूग , मटकी , राजमा , डाळिंब्या इ.)dalia usal

२)     एक वाटी दलियाचा रवा शिजवून

३)     एक चमचा साजूक तूप .

कृती :-

१)      उसळ आणि दलिया कालवून एकत्र करा .  तूप घाला .  एक वाफ दया .

२)     लागल्यास थोडं मीठ घाला .  मायक्रोवेव्हमध्येही करता येईल .