मोबाइल पर्सनल सिक्युरिटी अँप्लिकेशन्स

हल्ली प्रत्येकाकडे हमखास आढळणारी महत्वाची वस्तू म्हणजे मोबाईल’.mobile apps
हाच मोबाईल जर तुमचा पर्सनल बॉडीगार्ड झाला तर? हो, हे शक्य आहे! आजकाल बाजारात मिळणार्‍या सगळ्याच मोबाइलमध्ये काही ना काही सिक्युरिटी अँप्लिकेशन्स असतातच. पण त्यातल्या त्यात आयफोन, ब्लॅकबेरी, अँण्ड्रॉइड आदि मोबाइल प्रकारांमध्ये ही अँप्लिकेशन्स अधिक प्रमाणात आढळतात. अर्थात तंत्रज्ञानाच्या विकासाची गती लक्षात घेता आज जरी साध्या मोबाइल्समध्ये ही
अँप्लिकेशन्स नसतील तरी उद्या ती नक्की असतील. त्यामुळे आपल्याला या नव्या सुरक्षा अँप्सबद्दल माहीत असणे अत्यावश्यक आहे.


फाईटबॅक
यात पाच जणांचे मोबाइल नंबर फिड करावे लागतात. एक पॅनिक बटण ठरवावं लागतं. ते बटण दाबल्यानंतर जे मोबाइल क्रमांक नोंदवले गेले आहेत त्या क्रमांकांवर तुम्ही असुरक्षित असल्याचं कळवलं जातंच पण त्याचबरोबर हे अँप फेसबुकचीही मदत घेतं. संबंधित क्रमांकाच्या फेसबुक अकौंटस्नाही कळवलं जात
सर्कल ऑफ ६

सर्कल ऑफ ६ हे अँप्स ‘आयफोन’वर उपलब्ध आहे. एखादी
तरुणी संकटात सापडली आणि जर तिने फोनवर फक्त २ वेळा टकटक केलं की, हे अँप त्या तरुणीनं नोंदवलेल्या ६ मोबाइल क्रमांकावर ती तरुणी संकटात असल्याचा एसएमएस पाठवते. त्याचबरोबर ती तरुणी नेमकी कुठे आहे याची माहितीही हे अँप संबंधित मोबाइल क्रमांकांना कळवते. याही पुढे जाऊन या सहा पैकी एका नंबरवरून तरुणीला रिक्वेस्ट कॉलही येतो. जेणेकरून तरुणी फोनवर बोलून मदत मागू शकते. किंवा इतर माहिती कळवू शकते.

हल्लाबॅक
यात छेड काढणार्‍या, कुठल्याही कारणानं हल्ला करणार्‍या व्यक्तीचा फोटो काढण्याची सोय आहे. हा फोटो पोलीस स्टेशनमध्ये तर दाखवता येतोच पण हल्लाबॅकच्या साईटवरही अपलोड करण्याची सोय आहे. जेणेकरून सार्‍या जगाला छेड काढणार्‍याचा चेहरा दिसतो आणि असभ्य वर्तणूक करणारी व्यक्ती तसं वागल्यानंतर नामानिराळी होऊन समाजात वावरू शकत नाही. हल्लाबॅक ही एक आंतरराष्ट्रीय मोबाइल चळवळ आहे. आणि जगातल्या सर्व देशातल्या मोठय़ा शहरांमधून या चळवळीचं काम चालतं. हे अँप्स मोफत आहे.

सेंटीनेल
सेंटीनेल हे फक्त महिलांच्या सुरक्षिततेकरता तयार केलं गेलेलं अँप्लिकेशन आहे. यात तीन वेगवेगळ्या नोंदणी केल्या गेलेल्या मोबाइल नंबर आणि इमेल पत्त्यांवर संकटाच्या वेळी एसएमएस आणि इमेल जाते. इमेलमध्ये संकटात सापडलेली स्त्री नेमकी कुठं आहे याचा तपशीलवार पत्ताही दिला जातो. त्यामुळे संकटात सापडलेल्या तरुणीला मदत मिळणं शक्य होतं. सेंटीनेल हे मोफत अँप्लिकेशन आहे. फक्त एसएमएस आणि जीपीआरएस वापराचे जे काही पैसे मोबाइल प्लॅनमध्ये असतील तेवढाच खर्च या अँप्लिकेशन वापरासाठी होतो.

कॅब४मी
अडचणीच्या वेळी झटपट एखादी कॅब म्हणजेच प्रिपेड किंवा पोस्टपेड टॅक्सी मिळाली तर किती बरं होईल, असं नेहमीच वाटतं. अशावेळी कॅब४मी फार उपयोगी पडतं. इटपट एखादी कॅब शोधायला हे अँप मदत करतं. यातलं जीपीएस जवळपास असणारा टॅक्सी स्टॅण्ड किंवा प्रिपेड कॅबचं बुथ शोधायला मदत करतं.

5 Comments