उत्तप्पा

uttapam recipe in marathi
uttapam recipe in marathi

साहित्य :-

१)      दीड वाटी बारीक रवा

२)     अर्धी वाटी तांदळाचं वा डाळीचं पीठ

३)     एक वाटी ताक , तेल

४)     अर्धा चमचा बेकिंग पावडर

५)    चवीपुरतं मीठ .

वरून घालण्यासाठी :-

१)      बारीक चिरलेला कांदा

२)     टोमाटो , आलं

३)     हिरव्या मिरच्या

४)     कोथिंबीर यासर्वांच मिश्रण .

कृती :-

१)      रवा , पीठ ताक आणि मीठ एकत्र करून कोमट पाण्यानं भज्याच्या     पीठाइतपत घट्टसर भिजवावं .

२)     त्यात बेकिंग पावडर मिसळून दहा-पंधरा मिनिटं झाकून ठेवावं .

३)     नॉनस्टिक पैन किंवा तवा तापवून त्यावर थोडं तेल टाकून त्यात कांदा     घालावा आणि परतावा .

४)     त्यावर डावभर मिश्रण घालावं आणि जाडसर पसरावं .  वर कांदा-टोमाटो इत्यादींच मिश्रण घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजू दयावं .

५)    वाफ आल्यावर वर आणि कडेनं थोडं तेल सोडून उत्तप्पा उलटावा .  खालच्या बाजूनं लालसर झाला की चटणी सोबत दयावा .