हाक्का नूडल्स

साहित्य :-hakka noodles

१)      दोनशे ग्रॅम नूडल्स (शिजवून चाळणीवर निथळावे)

२)     अर्धी-पाऊण वाटी रिफाइंड तेल

३)     प्रत्येकी अर्धी वाटी लांबट चिरलेले पातीचे कांदे

४)     गाजर आणि भोपळी मिरची

५)    एक वाटी उभे चिरलेले मशरुम्स किंवा वाफवलेले चिकनचे तुकडे

६)      एक मोठा चमचा सोया सॉस

७)    एक मोठा चमचा टोमाटो सॉस

८)     मिरपूड आणि अजिनोमोटो

९)      चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      शिजवलेल्या नूडल्स तेलावर परतून घ्याव्या .  परतताना त्यावर मीठ , मिरीपूड आणि सोया सॉस टाकावा .

२)     नंतर त्याच कढाईत पुन्हा थोडं तेल तापवून त्यात कांदे , गाजर , भोपळी मिरची , मशरुम्स किंवा चिकन टाकून परतावं .

३)     परतताना थोडं मीठ , मिरपूड आणि अजिनोमोटो टाकून त्यावर नूडल्स टाकाव्या .

४)     टोमाटो सॉस टाकून परताव्या आणि छानपैकी काटा-चमच्यानं खायला दयाव्या .