whats ap मुळे Facebook वर मंदी

what ap
सोशल मिडिया म्हटलं कि त्यात अग्रेसर असलेलं सगळ्यांच्या परिचयाचं आणि सर्वांचं आवडत नावं ते म्हणजे facebook.ह्या माध्यमाने तरुणाई तसेच सर्वचं वयातील लोकांना असं काही वेड लावलं आहे कि लोकांची ती एक गरजचं बनली आहे,खासकरून कॉलेज तरुणांची……तासंतास facebook वर बसून chatting करन नवनवीन मित्र शोधनं ,आपल्या idea share करन हा तर रोजचाचं दिनक्रम..!
एकटेपणा घालवायचा उत्तम पर्याय म्हणून अनेक लोक या कडे बघतात.तर काही लोक चक्क जोडीदार सुद्धा या माधमातून शोधतात.तसेच व्यापार आणि प्रचार ह्यासाठी देखील facebook चा पवार केला जातो.भारतात facebook user ची संख्या कोट्यावधीच्या घरात आहे.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून android सिस्टीम असलेला स्मार्ट फोन बाजारात आला आणि त्यामुळे साधा मोबाईल वापरणाऱ्यांची अगदी वाताहतच झाली,शिवाय हे स्मार्ट फोन कमीत कमी किमतीत असल्या कारणाने ते वापरनार्यांचा ओघ वाढला.android मध्ये असलेल्या wats ap या application ने तर सर्व सोशल मिडिया आपल्या कडे आकर्षित केला आहे ,कुठलेही फोटो sharing असेल किव्हा video sharing असेल हे apps अगदी सोपे आणि facebook सारखे असल्या कारणाने तरुणाईचा ओघ ह्याकडे वाढला आहे.त्यामुळे facebook वर सध्या मंदिसारखी चिन्ह दिसत आहेत.