चीअर गर्ल्स नाचविल्याशिवाय IPL चं खेळ पूर्ण होऊ शकत नाही का?
|
IPL म्हटलं की लगेच आठवतो टो T-२० क्रिकेटचा खेळ आणि त्यातल्या चीयर गर्ल्स. चीयर गर्ल्स म्हटल्यानंतर सर्वांच्या नजरा वळतात अंगप्रदर्शन करून नाचणाऱ्या मुलींकडे.
प्रत्येक चौकार, षटकार अथवा विकेट पडल्यानंतर आपल्या संघाचे मनोधैर्य उंचावन्याच्या नावाखाली नाचणाऱ्या ह्या तरुणी शिवाय IPL पूर्ण होऊच शकत नाही का असा बहुदा आयोजकांचा समज असेल. मात्र, ह्या प्रकारामुळे कुठेतरी आपल्या भारतीय संस्कृतीला गालबोट लागण्यासारखी गोष्ट होतांना दिसते. कारण, तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करीत मैदानावरील हजारो लोकांसमोर अंगविक्षेप करीत नाचणे आपल्या आदर्श भारतीय संस्कृला अनुसरून नाही. ह्यामुळे आपल्या संस्क्रुचे अवमूल्यन होत असून पाश्चिमात्य संस्कृतीतील विकृतीला चालना मिळत आहे. खेळाडूने चौकार-षटकार मारल्यानंतर अथवा विकेट पडल्यानंतर ह्या चियर गर्ल्स नाचल्या तरच खेळाडू प्रोत्साहित होऊ शकतात का? करोडो भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या क्रिकेटच्या खेळात क्रिकेटच्या छंदापायी नको असला तरी हा डान्स-बार बघणे प्रेक्षकांना भाग पडत आहे. काही प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानावर बघतात, तर कोत्येक प्रेक्षक दूरचित्रवाहिनीवर हा तमाशा बघतात. ह्यातून होणाऱ्या दूरगामी परिणामाची जाणीव बहुदा नोटांच्या पाउस पाडणाऱ्या IPL च्या आयोजकांना आणि त्यातील सहभागी संघांच्या मालकांना नसावी. मात्र, तरुण वर्ग, खास करून लहान मुलांवर याचा वाईट परिणाम होतांना दिसून येत आहे. आधीच आपल्या देशात बलात्काराच्या घटनांच्या वाढलेल्या प्रमाणामुळे सारा देश चिंतेत आहे, त्यातच स्त्रीदेहाचे असे जाहीर प्रदर्शन अशा घटनांना उत्तेजन देण्याचेच काम जणू करीत आहे असे वाटते. आयोजकांनी याची दाखल घेऊन IPL मधील ह्या प्रकाराबाबत योग्य बदल करावा हीच अपेक्षा!