झपाटलेला-२ 3D ७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय

              यशस्वी झालेल्या हिंदी चित्रपटांचे ‘सिक़्वल’ म्हणजेच दुसरा भाग बरेचदा पाहायला मिळतात,zapatlela 2 मात्र आता हाच प्रयोग मराठी चित्रपटात देखील पाहायला मिळणार आहे.
तुम्हाला आठवत असेल? अं हं! आठवणारंच! १९९३ साली आलेला महेश कोठारे दिग्दर्शित धमाल विनोदी थरारपट ‘झपाटलेला’! ह्या चित्रपटातील दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेलं ‘तात्या विंचू’ हे पात्र आजही लोकांच्या स्मरणात आहे!
हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर कमालीचा यशस्वी ठरला होता. आता ह्याच चित्रपटाचा दुसरा भाग येत्या ७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाचे नाव अर्थातच ‘झपाटलेला २’ असेल. झपाटलेला मधील बोलका बाहुला ह्याही चित्रपटात दिसणार असून ह्यात त्याचे नाव ‘तात्या वेंचो’ असे आहे. ‘झपाटलेला-२’चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा मराठी भाषेतला पहिलाच ‘३-D’ चित्रपट असेल. ह्या चित्रपटात आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर आणि मकरंद अनासपुरे ह्यांच्या प्रमुख भूमिका असून दिग्दर्शनाची धुरा अर्थातच महेश कोठारेंनी सांभाळली आहे. संगीत अवधूत गुप्तेंचं आहे.

‘झपाटलेला’ प्रमाणेच ‘झपाटलेला-२’ ही कमालीचा यशस्वी व्हावा ह्याच शुभेच्छा!

 

 

One Comment